Manasvi Choudhary
बदलत्या हवामानानुसार घरोघरी डासांची समस्या वाढली आहे. विशेषतः संध्याकाळची वेळ झाली की घरांमध्ये डासांचा उपद्रव वाढतो.
डासांना दूर ठेवण्यासाठी अनेकजण बाजारातील विषारी कॉइल्स , केमिकल स्प्रे किंवा लिक्विडचा वापर करतात, पण केमिकल्सयुक्त उत्पादने आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.
डासांना पळवून लावण्यासाठी रासायनिक उत्पादनांऐवजी तुम्ही काही नैसर्गिक आणि प्रभावी घरगुती उपाय करू शकता. लिंबाच्या सालीचा वापर करून घरातील डास झटक्यात कसे पळवून लावता येतील, हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
सर्वात आधी एक ताजे लिंबू कापून त्याचा रस काढून घ्या. त्यानंतर लिंबाच्या दोन्ही भागांमधील उरलेला गर चमच्याने व्यवस्थित खरवडून घ्या आणि उरलेली लिंबाची साल स्वच्छ करा.
त्यानंतर कापसाची एक लहान वात बनवा आणि ती त्या लिंबाच्या सालीतील पावडरमध्ये ठेवा. त्यावर थोडे कडुनिंबाचे तेल किंवा मोहरीचे तेल टाका.
या वातीच्या आजूबाजूला किंवा वरच्या भागात थोडे कापराचे तुकडे ठेवा. आता ही वात पेटवून घ्या आणि घरातील ज्या कोपऱ्यात किंवा खोलीत जास्त डास असतात, तिथे ठेवा.