Konkan Tourism : दिवाळीच्या सुट्टीत फिरा कोकणातलं मिनी महाबळेश्वर, पाहता क्षणी निसर्गाच्या प्रेमात पडाल

Shreya Maskar

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात माचाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. कोकण हे परदेशी पर्यटकांचे देखील आकर्षण आहे.

hill station | yandex

कोकणचे महाबळेश्वर

माचाळ हे 'कोकणचे महाबळेश्वर' किंवा 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते. दाट धुके, हिरवीगार झाडी आणि थंड हवामान येथे अनुभवता येते.

hill station | yandex

मुचकुंदी

माचाळ हे मुचकुंदी नदीचे उगमस्थान आहे. माचाळ गावातील मुचकुंद ऋषींच्या गुहेजवळून या नदीचा उगम होतो.

hill station | yandex

कधी भेट द्यावी?

हिवाळ्यात आणि पावसाळ्यात माचाळ या हिल स्टेशनला भेट द्या. येथे तुम्हाला सुंदर वातावरण पाहायला मिळेल. येते घनदाट जंगल आहे.

hill station | yandex

सह्याद्री पर्वतरांग

माचाळ हे सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले आहे. परदेशी पर्यटक देखील येथे हिवाळ्यात गर्दी करतात. कोकणाचे हे पर्यटन आकर्षण आहे. सह्याद्री पर्वतरांगचा नजारा मनात घर करून राहतो.

hill station | yandex

ट्रेकिंग

माचाळ ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यात ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळे मित्रांसोबत सुट्टीत फिरण्याचा येथे नक्की प्लान करा. दिवाळीच्या सुट्टीत फिरण्यासाठी हे खास लोकेशन आहे.

hill station | yandex

गुहा

माचाळ गावाच्या पठारावर मुचकुंद ऋषींची प्राचीन गुहा आहे. गुहेशी संबंधित एक पौराणिक आख्यायिका आहे. माचाळला गेल्यावर गुहा पाहायला नक्की जा.

hill station | yandex

औषधी वनस्पती

माचाळच्या घनदाट जंगलांमध्ये अनेक औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो.

hill station | yandex

NEXT : घनदाट जंगल अन् उंच डोंगरांमध्ये वसलाय किल्ला, दिवाळीत भंडारा जिल्ह्यात ट्रिप प्लान करा

Bhandara Tourism | yandex
येथे क्लिक करा...