Shreya Maskar
माचाळ हिल स्टेशन कोकणात रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यात वसलेले आहे. येथील धुक्यामुळे या ठिकाणाला 'कोकणचे मिनी महाबळेश्वर' म्हटले जाते.
सह्याद्री पर्वतरांगेत ३,००० ते ४,००० फूट उंचीवर माचाळ हिल स्टेशन वसलेले आहे.आल्हाददायक हवामान, दाट हिरवळ आणि पश्चिम घाटाची विहंगम दृश्ये येथे अनुभवता येतात.
माचाळ हिल स्टेशनला निसर्गाचा अद्भूत नजारा पाहायला मिळतो, त्यामुळे तुम्ही येथे सुंदर फोटोशूटचा आनंद घेता येतो. तसेच येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. येथे तुम्ही कॅम्पिंगचा देखील आनंद घेऊ शकता.
रत्नागिरी स्टेशनला उतरून पुढे तुम्ही रिक्षा , बस किंवा स्वतःच्या गाडीने माचाळ हिल स्टेशनपर्यंत जाऊ शकता. आजूबाजूला राहण्याची आणि खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.
माचाळ हिल स्टेशन जवळ विशाळगड किल्ला आहे. जेथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. मित्रांसोबत आताच येथे ट्रिप प्लान करा.
रत्नागिरीत दापोली हे देखील एक सुंदर हिल स्टेशन आहे. दापोली स्वच्छ व निसर्गरम्य समुद्रकिनारे, आल्हाददायक सागरी हवामान आणि हिरव्यागार निसर्गासाठी प्रसिद्ध आहे.
माचाळ येथे मुचकुंडी नदीचा उगम होतो, जिचे पाणी अत्यंत स्वच्छ आणि ख्रिस्टलसारखे दिसते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.