Shreya Maskar
लिची शेक बनवण्यासाठी लिची, पाणी, लिंबाचा रस, काळे मीठ, साखर, काळी मिरी पावडर इत्यादी साहित्य लागते.
लिची शेक बनवण्यासाठी सर्वप्रथम लिची सोलून बिया काढून गर वेगळा करा.
त्यानंतर मिक्सरमध्ये लिचीचा गर, पाणी आणि साखर टाकून पेस्ट बनवा.
आता हा रस एका बाऊलमध्ये काढून त्यात काळे मीठ, काळी मिरी पावडर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा.
आता थोडा वेळ हा लिची शेक थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
एका ग्लासच्या कडेला मीठ-मसाल्याचे मिश्रण लावा आणि त्यात लिची शेक ओता.
त्यानंतर यात काही बर्फाचे तुकडे घाला.
शेवटी पुदिन्याची पाने घालायला विसरू नका.