ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अनेक गोष्टी ठेवल्या जातात किंवा बनवल्या जातात.
झाडे, वृक्ष, वेली आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा करतात. त्यामुळे घराजवळ अंगनात झाडे असणे गरजेचे आहे.
तुळस ही एक औषधी वनस्पती आहे. तसेच तिला लक्ष्मीचे रुप मानले जाते. त्यामुळे घरात काही नैराश्य किंवा आर्थिक समस्या असल्यास दारात तुळस लावाली.
हिंदू धर्मातील पुराणानुसार आवळा वृक्षावर देवतांचा वास असतो. त्यामुळे ज्या घराजवळ हे वृक्ष असते तेथे कधीच पैशांची कमतरता भासत नाही.
श्वेतार्क ही एक वनस्पती आहे. या रोपावर हळद, अक्षत आणि जल वाहिल्याने घरात सदैव सुख-शांती राहते. त्यामुळे आर्थिक समस्या देखील उद्भवत नाहीत.
ज्योतिषशास्त्रानुसार शमी ही एक वनस्पती आहे, याचा थेट संबंध शनी देवाशी आहे. तुमच्या राशीला शनी प्रबळ असेल तर या वनस्पती पुजा करावी.
अशोक हे हिंदू धर्मात अत्यंत शुभ वृक्ष मानले जाते. हे वृक्ष घरासमोर अंगनात असल्यास वास्तुदोष देखील संपतात.
वास्तुदोष असल्यास तुम्ही देखील घरासमोर या पैकी कोणतेही एक झाड लावू शकता.
टीप : वास्तुशी निगडीत ही फक्त सामान्य माहिती आहे. तुम्ही तुमच्या घराच्या बांधणी प्रमाणे ज्योतिशांच्या मदतीने देखील उपाय करू शकता.