Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचे भविष्य निश्चित केले जाते. आज आपण महाभारतातील अशा पात्रांविषयी बोलणार आहेत जे जन्माच्या संख्येशी जुळतात तर ही पात्र कोणती आहेत जाणून घ्या.
क्रमांक १ लोक सूर्य ग्रहाचे अधिपत्य करतात आणि करण हे महाभारतातील पात्र त्यांच्याशी जुळते कारण त्याला सुर्यपुत्र म्हणूनही ओळखले जात असे.
अंक २ चे लोक चंद्र ग्रहद्वारे नियंत्रित असतात जो भावना आणि पाणी दर्शवितो. महाभारतातील गंगेचा पत्र भीष्म हा पात्र या जन्म क्रमांकाशी जुळतो.
अंक ३ चे लोक गुरू ग्रहाद्वारे नियंत्रित असतात जो ज्ञान आणि बुद्धीचे प्रतिनिधित्व करतो गुरू द्रोणाचार्य हे महाभारतातील एक मुख्य पात्र आहेत जे या जन्म संख्येशी जुळतात. ते सर्व पांडव आणि कौरवांचे गुरू होते.
अंक ४ चे लोक राहू ग्रहाद्वारे नियंत्रित असतात जो भ्रम, अंधाराचे प्रतिनिधित्व करतो आणि कौरवांमधील दुर्योधन हा अंक महाभारत यु्द्धासाठी जबाबदार आहे.
अंक ५ चे व्यक्ती बुध ग्रहाच्या नियंत्रणाखाली असतात जो विज्ञान, ज्ञान, बुद्धिमता दर्शवतो. महाभारतातील सर्वात महत्वाच्या पात्रांपैकी एक म्हणजे भगवान श्रीकृष्ण
६ या अंकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचे राज्य असते हा ग्रह स्त्रीशक्तीचे प्रतिनिधित्व करतो जी सुंदर तरीही बलवान आहे. महाभारतातील एक महत्वाची पात्र दौप्रदी या जन्म संख्येशी जुळते.
७ या अंकाच्या व्यक्तींवर केतू ग्रह राज्य करतो जो धार्मिकता आणि अध्यात्म दर्शवतो धर्मराज यिधिष्ठिर या जन्मक्रमांकाशी जुळतो.
जन्मक्रमांक ८ या लोकांच्या लोकांर शनि ग्रहाचे राज्य असते जो शिस्त, न्याय आणि कर्माचे प्रतिनिधित्व करतो. विदुर हा महाभारतातील पात्रांशी जुळतो.
९ या अंकाच्या लोकांवर मंगळ ग्रहाचे राज्य असते जो शक्ती , धैर्य दर्शवतो. महाभारतातील भीम पात्र या जन्म संख्येशी जुळतो