LPG सब्सिडी मिळत नाहीये का? खात्यात पैसे का येत नाहीयेत? घरी बसून चेक करा स्टेट्स

Bharat Jadhav

किती मिळते सब्सिडी

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली वाढ आणि त्यातच २१० रुपयांचे अनुदान (सबसिडी) खात्यात जमा न होणे, यामुळे चिंता वाटणे स्वाभाविक आहे. 'उज्ज्वला' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हे २१० रुपयेही खूप महत्त्वाचे असतात.

घरी बसून करा चेक

सब्सिडी मिळवण्यासाठी वारंवार गॅस एजन्सीकडे जाण्याची गरज नाही. तुमची सबसिडी खात्यात जमा झालीय का अडकली आहे की परत गेली आहे, हे तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईल फोनवरून सहज तपासू शकता.

Lpg Subsidy Status Check: How To Check ₹210 Gas Subsidy Online

नवीन वेबसाइट

सरकारने mylpg.in नावाची एक वेबसाइट सुरू केली आहे, जिथे तुम्ही अवघ्या दोन मिनिटांत सर्व तपशील पाहू शकता. तुम्ही घरी बसूनच तुमच्या सब्सिडीची स्थिती कशी तपासू शकता? ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

Lpg Subsidy Status Check: How To Check ₹210 Gas Subsidy Online

ऑनलाइन स्टेट्स असं तपासा

सर्वात आधी तुमच्या फोनवर mylpg.in वेबसाईट उघडा. होमपेजवर तुम्हाला तीन सिलिंडर दिसतील. इंडेन (Indane), भारत गॅस (Bharat Gas) आणि एचपी गॅस (HP Gas). तुमच्या गॅस कंपनीशी संबंधित पर्यायावर क्लिक करावे.

Lpg Subsidy Status Check: How To Check ₹210 Gas Subsidy Online

Subsidy Not Received वर क्लिक करा

पुढील पेजवरच्या मेनूमध्ये जाऊन 'Give Your Feedback Online' वर क्लिक करावे. त्यानंतर, श्रेणींमधून 'LPG' निवडा आणि 'Subsidy Related (PAHAL)' हा पर्याय निवडा. आता 'Subsidy Not Received' वर क्लिक करा.

Lpg Subsidy Status Check: How To Check ₹210 Gas Subsidy Online

सब्सिडीची हिस्ट्री दिसेल

तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा १७ अंकी एलपीजी (LPG) आयडी टाका आणि सबमिट करा. त्यानंतर तुमच्या सर्व बुकिंग्ज आणि सब्सिडींची यादी स्क्रीनवर दिसेल. यामध्ये तुम्हाला नेमके कधी पैसे मिळाले किंवा मिळाले नाहीत, हे दिसून येईल.

Lpg Subsidy Status Check: How To Check ₹210 Gas Subsidy Online

या कारणामुळे नाही येत सब्सिडी

जर तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीकडे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुमची सब्सिडी रोखली जाऊ शकते. सब्सिडी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होत असते. तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे आणि डीबीटी सुविधा सक्रिय असणे आवश्यक आहे. जर डीबीटी सुविधा बंद असेल तर रक्कम खात्यात जमा होत नाही.

Lpg Subsidy Status Check: How To Check ₹210 Gas Subsidy Online

नावात चूक अन् Inactive बँक खाते

तुमच्या गॅस कनेक्शनसाठी नोंदवलेले नाव आणि तुमच्या बँक खात्यावरील नाव यामध्ये काहीही फरक असल्यास अगदी स्पेलिंगमधील किरकोळ तफावत असली तरीही सिस्टमद्वारे पेमेंट रोखले जाते. काही प्रकरणांमध्ये, दीर्घकाळ वापर न केल्यामुळे बँक खाते निष्क्रिय होऊ शकते अशा परिस्थितीत खात्यात रक्कम जमा होत नाहीत.

Lpg Subsidy Status Check: How To Check ₹210 Gas Subsidy Online

हेही वाचा

येथे क्लिक करा

Aadhaar-PAN मध्ये तुमचा पत्ता बदलायचा आहे का? घरबसल्या असं करा अपडेट