Sakshi Sunil Jadhav
वाढत्या गर्मीमध्ये फक्त इलेक्ट्रीक वस्तू नाही तर घरातल्या बाटल्याकडेही लक्ष दिलं पाहिजे.
उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे सिलेंडरचाही ब्लास्ट होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही घरातल्या काही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे.
सिलेंडरमध्ये LPG गॅस भरलेली असते. त्यामुळे जेव्हा बाहेरचं उष्णतेचं तापमान वाढतं, तेव्हा सिलेंडरमधलंही तापमान वाढतं.
तुमचा बाटल्याच्या वॉल्ववर जर गंज, ओलसरपणा किंवा तेलकटपणा दिसत असेल तर तो बाटला वापरणं टाळा.
बऱ्याचदा गॅस लिकेज होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे सिलेंडरचा नॉब खुला असणे. त्यातून सुरुवातीला वास येतो. त्यामुळे रेग्युलेटर लगेचच बंद करा.
बऱ्याचदा लोक गॅसचा पाईप बदलत नाहीत. त्यामुळे सिलेंडरचा स्फोट होऊ शकतो.
स्वयंपाक घरात खूप अडचण असेल, ऊन येत असेल तर किंवा तापलेल्या वातावरणात तुम्ही बाटला वापरत असाल तर स्फोट होण्याचा धोका वाढू शकतो.
उन्हाळ्यात सगळ्यात आधी तुम्ही रेग्युलेटर बंद करा. जेवण बनवतानाच त्याचा वापर करा. याने तुम्ही सुरक्षित राहाल.