Sakshi Sunil Jadhav
उन्हाळ्यातलं वाढतं तापमान लो ब्लड प्रेशर (Low Blood Pressure)असलेल्या व्यक्तींसाठी त्रासदायक ठरू शकतं.
सध्याच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने उलटी सारखं वाटणं, चक्कर, अशक्तपणा, जेवण न पचनं अशा अनेक समस्या जाणवतात.
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातलं पाणी कमी होतं. त्यामुळे दिवसभर पुरेसं पाणी पित राहा आणि बाहेर जाताना काळजी घ्या.
ब्लड प्रेशर लो होऊ नये म्हणून दिवसातून एकदा नारळपाणी, ताक, लिंबूपाण्याचं सेवन करा. त्याने शरीराला सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मिळतं.
केळी, कलिंगड, काकडी आणि दही ही फळं खाल्ल्याने एनर्जी वाढते. त्याने ब्लड प्रेशर लो होत नाही.
तुम्ही एकाचवेळी जास्त खाणं टाळलं पाहिजे. जड जेवणामुळे शरीरातला रक्तप्रवाह पचनक्रियेकडे वळतो. त्याने BP असलेल्या व्यक्तींना चक्कर किंवा थकवा येतो.
बराच काही न खाता राहिल्याने रक्तदाब कमी होतो. त्यामुळे थोड्या- थोड्या अंतराने हलके पदार्थ खात राहा.
बीपीच्या रुग्णांनी कधीच बिछान्यावरून किंवा खुर्चीवरून घाईत उठलं नाही पाहिजे. हळूहळू उठून शरीराला जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ द्या.
लो ब्लड प्रेशरची समस्या वारंवार जाणवत असल्यास किंवा चक्कर, अशक्तपणा आणि बेशुद्ध पडण्याची लक्षणे दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.