Shraddha Thik
प्रत्येकाला नवीन ठिकाणांना भेट द्यायला आवडते. त्या ठिकाणाची माहिती घेणे, नवीन खाद्यपदार्थ्यांचा आस्वाद घेणे इ. तुम्हालाही आवडते.
तसेच प्रवासाची आवड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.
प्रवासादरम्यान तुम्हाला कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही याची खात्री करण्यासाठी, तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स काढणे महत्त्वाचे आहे. पाहा ट्रॅव्हल इन्शुरन्स काय कव्हर करते.
ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला मेडिकल इमर्जन्सीच्या काळात होणाऱ्या खर्चापासून संरक्षण देतो. हॉस्पिटलची बिले, रुग्णवाहिकेचे शुल्क आदी खर्चांचा यात समावेश आहे.
तुम्ही फ्लाइटमधुन प्रवास करता तेव्हा चुकून तुमचे सामान हरवले तर त्यासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये तुमचे सामान परत मिळण्यास मदत होईल.
प्रवास करताना अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, ट्रॅव्हल इन्शुरन्स तुमच्या कामी येतो. प्रवास करताना तुम्हाला दुखापत झाली तरीही, तुमच्या इन्शुरन्समधून संपुर्ण खर्च करता येईल.
आजकाल बर्याच इन्शुरन्स कंपन्या व्हिसा अर्ज नाकारल्यास व्हिसाच्या पैशाच्या परताव्याच्या पर्यायी अॅड-ऑन ऑफर देतात, तुम्ही याचाही लाभ घेऊ शकता.