Shruti Vilas Kadam
एखाद्या नात्यात जेव्हा एखादी व्यक्ती सुरुवातीला खूप प्रेम, कौतुक, भेटवस्तू देते आणि लक्ष देते ते ‘लव्ह बॉम्बिंग’ असू शकते. हे केवळ प्रेम नसून नियंत्रणाचा प्रकार असतो.
लव्ह बॉम्बिंग करणारी व्यक्ती सुरुवातीलाच लग्न, भविष्य यावर बोलू लागते आणि तुमच्यावर पूर्णपणे हक्क गाजवू लागते.
तुमचं लक्ष वेधण्यासाठी ते सतत गिफ्ट्स, मेसेज, फोन कॉल्स, सरप्राईज यांचा वर्षाव करतात. यामुळे तुम्हाला ते खूप प्रेम करत आहेत असं वाटतं.
ते तुमच्या वेळेवर, सवयींवर, कुणाला भेटता त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. इतर नात्यांपासून तुम्हाला दूर ठेवतात.
तुम्ही जर थोडं अंतर ठेवायचा प्रयत्न केला, तर ते लगेच दुखावतात, रागवतात किंवा तुम्हाला दोष देतात. त्यामुळे तुम्हीच चुकीचे आहात असं वाटू लागतं.
सुरुवातीलाच खूप प्रेम, मग अचानक दुर्लक्ष, टीका आणि शेवटी नातं तोडणं – असा भावनिक गोंधळ या नात्यांमध्ये दिसतो.
जर एखादं नातं खूप लवकर, अतिप्रम व तीव्रतेने सुरू झालं असेल आणि तुमचं मानसिक समाधान कमी झालं असेल, तर सतर्क राहा. ‘लव्ह बॉम्बिंग’पासून स्वतःचं रक्षण करा.