Sakshi Sunil Jadhav
वजन कसं- कधी वाढतं हे अनेकांच्या लक्षातच येत नाही. आपण घरचंच खाल्लं तरी आपला फॅट वाढत असतो.
तुम्ही अशावेळेस तुमच्या आहारात काही पौष्टीक पदार्थांचा समावेश करुन फिट राहू शकता. या पोट कमी करण्याचा एक सोपा मार्ग असेल.
पुढील माहितीत आपण वजन कमी करण्यासाठी आहारात भाज्यांचं थालीपीठ कशी बनवायची? याची एक भन्नाट सोपी आणि झटपट रेसिपी जाणून घेणार आहोत.
बटाटा, गाजर, कांदा, कढीपत्ता, कांद्याची पात, मिरची, ज्वारीचं पीठ, बेसन, नाचणीचं पीठ, तीळ, हळद, मीठ, लाल तिखट आणि तेल इ.
सर्वप्रथम बटाटे उकडून बारिक करुन घ्या. मग कांदा, कढीपत्ता, कांद्याची पात आणि मिरची बारिक करुन त्यामध्ये मिक्स करा.
आता दुसरीकडे पीठ मळायला घ्या. त्यामध्ये ज्वारी, बेसन, नाचणी मिक्स करुन एक हेल्दी रेसिपी बनवा.
पुढे पीठात तीळ, जिरे पावडर, मीठ, हळद आणि मिरी पावडर मिक्स करुन कणीक व्यवस्थित मळून घ्या. त्यामध्ये पाण्याचा समावेश थोडा जास्त करु शकता.
पीठ १० मिनिटं झाकून ठेवा आणि तव्यावर हाताने थापून थालीपीठासारखा आकार द्या.
तव्यावर कमी तेलात दोन्ही बाजूंनी भाजून ही रोटी तयार करा. रायत्यासोबत खाल्ल्याने जास्त चविष्ट लागते.