Shreya Maskar
विषाणूजन्य किंवा जिवाणूजन्य संसर्गामुळे पोटाचा फ्लू होतो. यांच्या लक्षणांमध्ये जुलाब, मळमळ, उलट्या पोट दुःखी यांचा समावेश आहे.
तुम्हाला वारंवार पाण्यासारखे जुलाब होत असतील तर हे फूड पॉइजनिंगचे लक्षण असू शकते. पावसाळ्यात दूषित अन्न किंवा विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे असे होते. उलट्या होतात, पोटात आणि छातीत मळमळते.
थायरॉईड ग्रंथीच्या अति सक्रियतेमुळे तुमची चयापचय क्रिया वाढते. या जलद पचनसंस्थेतील हालचालीमुळे वारंवार जुलाब होतात किंवा हायपरथायरॉईडीझमसोबत हृदयाचे ठोके वाढतात आणि वजन कमी होते.
इरिटेबल बाऊल सिंड्रोम हा आतड्यांचा विकार आहे. यामध्ये पोटात पेटके येणे , वारंवार जुलाब होणे, बद्धकोष्ठतेची समस्या जाणवते.
सेलिॲक डिसीजमध्ये ग्लूटेन खाल्ल्याने लहान आतड्याला नुकसान पोहोचते. लक्षणांमध्ये दीर्घकाळ टिकणारा जुलाब, गॅस, पोट फुगणे आणि थकवा यांचा समावेश होतो.
मॅलअॅबसॉर्प्शन सिंड्रोम हा पचनसंस्थेचा विकार आहे. ज्यामुळे लहान आतड्याची अन्नातून चरबी, कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखी आवश्यक पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमता कमी होते. यामुळे वजन कमी होते.
इन्फ्लेमेटरी बाऊल डिसीज यात पचनमार्गामध्ये वारंवार जळजळ होते आणि सूज येते. यात क्रोन्स डिसीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस हे त्याचे दोन सर्वात सामान्य प्रकार आहेत. यात ॲसिडीटी आणि जुलाब होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.