Shreya Maskar
पुरेशी विश्रांती, पोषक घटक, वेळ मर्यादा लक्षात न घेता प्रमाणापेक्षा जास्त वेळ धावल्याने शरीरावर प्रचंड शारीरिक ताण येऊ शकतो. मानसिक आरोग्यही बिघडते.
जास्त वेळ धावण्यामुळे सांधे आणि स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी यांसारख्या दुखापती होऊ शकतात. ज्यांना संधिवातासारखे आजार आहेत त्यांनी जास्त धावणे टाळा.
हृदयाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी तीव्र गतीने धावणे टाळा. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर ताण येते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. धावण्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढतो.
दीर्घकाळ धावल्याने कधीकधी पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, जसे की पोटात गोळे येणे, मळमळ किंवा अतिसार होणे. त्यामुळे जास्त धावणे टाळा.
धावताना वातावरणात प्रदूषण असते किंवा हवा थंड-गरम असते, ज्याचा श्वासनावर परिणाम होतो. श्वास घेताना त्रास होतो. दमाची समस्या असलेल्या लोकांनी म्हणून कंट्रोलमध्ये धावा. यामुळे खोकला , धाप लागू शकते.
पुरेशी विश्रांती न घेता वारंवार धावल्याने थकवा येतो. रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होते. मानसिक ताण वाढतो. ज्यामुळे शारीरिक थकवा येऊ शकतो.
उन्हाळ्यात जास्त धावल्याने डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका वाढतो. जेव्हा तुम्ही धावता तेव्हा तुमच्या शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स घामाद्वारे कमी होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.