Ruchika Jadhav
अनेक तरुणींना हातांची आणि पायांची नखे लांब असणं फार आवडतं.
नखं वाढल्याने आपण सुंदर दिसतो, असं काहींना वाटतं. मात्र ही सुंदरता आरोग्यासाठी घातक आहे.
हाताची नखं वाढवल्यास त्यात बुरशी जन्य कॅवीटी साठते. यातील जंतू आपल्या शरीरात गेल्यास त्रास होतो.
अनेक मुली पायांची नखं देखील वाढवतात. मात्र अशावेळी पायाला ठेच लागल्यावर संपूर्ण नख उखडण्याची भीती असते.
नखांमध्ये कचरा साठल्याने जेवण बनवताना याचे काही कण आपल्या शरीरात जातात.
यामुळे तब्येतीवर गंभीर परिणाम होतो. व्यक्तींना जुलाब आणि उलट्या अशा समस्या निर्माण होतात.
त्यामुळे तुम्ही देखील नखं वाढवत असाल तर आजच ही सवय बंद करा.
आजारी पडण्यापासून वाचण्यासाठी सर्वात आधी नखे वाढवणे बंद करा.