Shruti Vilas Kadam
काळ्या मण्यांची साखळी आणि मधोमध साधे किंवा नक्षीदार पेंडंट असलेले डिझाइन हे कायमस्वरूपी ट्रेंडमध्ये असते. हे रोजच्या वापरासाठी उत्तम मानले जाते.
पूर्ण सोन्याचा मोठा किंवा कोरीव पेंडंट असलेले लाँग मंगळसूत्र पारंपरिक लूक देणारे असते. सण-समारंभ आणि लग्नकार्यांसाठी हे डिझाइन खास निवडले जाते.
हलके, साधे आणि कमी नक्षी असलेले लाँग मंगळसूत्र ऑफिस वेअर किंवा दैनंदिन वापरासाठी योग्य ठरते. कमी दागिन्यांमध्येही एलिगंट लूक देते.
कुंदन, झिरकॉन किंवा रंगीत स्टोन लावलेले लाँग मंगळसूत्र पार्टीवेअर आणि फेस्टिव्ह लूकसाठी परफेक्ट असते.
दोन साखळ्यांचा थर असलेले लाँग मंगळसूत्र आधुनिक आणि ट्रेंडी दिसते. हे साडी तसेच कुर्तीवरही छान शोभून दिसते.
देवदेवतांच्या नक्षीचे पेंडंट आणि पारंपरिक डिझाइन असलेले मंगळसूत्र सांस्कृतिक लूक देणारे असते. हे डिझाइन दक्षिण भारतीय स्टाईलमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
नावाचे अक्षर, हृदयाचा आकार किंवा खास सिंबॉल असलेले कस्टम लाँग मंगळसूत्र आजच्या तरुणींची पहिली पसंती ठरत आहे.