Manasvi Choudhary
लांब, काळेभोर आणि चमकदार केस असावे असे प्रत्येक महिलेला वाटते यासाठी महिला केसांची काळजी घेतात. पार्लरमध्ये जाऊन केसांवरती उपाय करतात.
कोरफड जेलमध्ये एरंडेल तेल मिसळून टाळूवर आणि केसांना हलक्या हाताने मसाज करा. एरडेल तेल आणि कोरफड तेल केसांना लावल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते.
आवळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे केसांच्या मुळांना मजबूती देतात. आवळा पावडर आणि शिकेकाई पावडर पाण्यात किंवा दह्यात भिजवून ही पेस्ट केसांना लावा.
खोबरेल तेलात मूठभर कढीपत्त्याची पाने मिक्स करून हे मिश्रण उकळून घ्या. हे तेल थंड झाल्यावर आठवड्यातून किमान दोनदा रात्री झोपण्यापूर्वी टाळूची चांगली मालिश करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.