Manasvi Choudhary
केस लांब आणि दाट होण्यासाठी महागड्या ट्रिटमेंटपेक्षा घरीच उपाय करा.
तेल लावणे पुरेसे नाही, तर ते कोमट करून लावल्यास केसांना अधिक फायदा होतो.
तांदूळ अर्धा तास भिजवून ठेवा किंवा शिजवलेल्या तांदळाची पेज करा आणि केस धुण्यापूर्वी केसांना लावा
दर तीन महिन्यांनी केसांना ट्रीम करा दुभंगलेले केस केसांची वाढ थांबवतात यामुळे केसांना खालून पोषण मिळते आणि ते जाड दिसतात.
केसांच्या मजबूतीसाठी आहारात अंडी, सोयाबीन, सुका मेवा आणि आवळा यांचा समावेश करा.
केस धुताना थंड किंवा कोमट पाण्याचाच वापर करा. गरम पाण्यामुळे केस कोरडे होतात. शाम्पू थेट टाळूवर न लावता तो पाण्यात मिसळून वापरा.
केसांच्या टाळूमध्ये नैसर्गिक ग्रंथी असतात ज्या 'सिबम नावाचे तेल तयार करतात. हे तेल केसांचे कंडिशनिंग करते आणि त्यांना मऊ ठेवते. रोज केस धुतल्याने हे तेल पूर्णपणे निघून जाते, ज्यामुळे केस कोरडे, निर्जीव आणि कमकुवत होतात. यामुळे केस आठवड्यातून 2 ते 3 वेळा धुवावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.