Shreya Maskar
कामानिमित्त आणि शिक्षणानिमित्त बरेच लोक एकटे स्वतःच्या घरापासून दूर होतात. त्यामुळे त्यांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
नैराश्य एकटेपणामुळे होणारी सर्वात मोठी आणि गंभीर मानसिक समस्या आहे. यामुळे व्यक्तीला सतत एकटे वाटते आणि नकारात्मक भावना मनात येतात. ज्यामुळे हळूहळू आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कमी होतो.
Social Anxiety
एकटे राहणाऱ्या लोकांना अनेकदा इतरांशी संवाद साधण्यात अडचण येतात. ते संकोच करतात, घाबरतात आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये त्यांना लाजही वाटते. अशा परिस्थितीत लोक इतरांशी संपर्क टाळण्यासाठी मुद्दाम स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवतात.
एकटेपणामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, लठ्ठपणा इत्यादी अनेक गंभीर आजार होऊ शकतात. कारण एकटे राहण्यामुळे आहार , झोप , व्यायाम यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते.
आजकाल तरूणांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. कारण अयोग्य जीवनशैली आणि जंक फूडच्या अतिरिक्त सेवनाने लठ्ठपणा वाढतो परिणामी टाईप २ ची समस्या उद्भवते. तणाव आणि एकाकीपणामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
तुमचे शरीर सतत पळत असते, त्याला योग्य वेळी आणि योग्य प्रमाणत आराम मिळत नाही, ज्यामुळे ते थकते. तणाव वाढतो. तुमची झोप पूर्ण होत नाही किंवा तुम्हाला झोप लागत नाही अशा समस्या उद्भवतात. निद्रानाशची समस्या उद्भवते.
एकटेपणाचा संबंध उच्च रक्तदाब आणि हृदयाशी जोडलेला आहे. एकटेपणामुळे सतत विचार वाढतो, ज्यामुळे ताण वाढतो परिणामी हृदयविकाराचा धोका वाढतो. तसेच हाय बीपीची समस्या उद्भवते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.