Manasvi Choudhary
मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी रेल्वे अनेकांसाठी जीवघेणी ठरत आहे.
रेल्वेने प्रवास करताना अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे यामागचे कारणे अनेक आहेत.
वेळेची घाई, उशिराने धावणाऱ्या रेल्वे, क्षमतेपेक्षा कितीतरी पटींची गर्दी व अपुऱ्या सुविधा यामुळे लोकल प्रवास जीवघेणा झाला आहे. अनेक अपघातांचे प्रमाण वाढले.
मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत मुंबई उपनगरीय रेल्वेवर ४८४१ अपघात झाले आहेत.
या दुर्घटनांमध्ये २२८७ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २५५४ प्रवासी जखमी झाले आहेत. माहितीनुसार, दररोज सरासरी १३ प्रवासी लोकल अपघातांचे बळी ठरत आहे.
या अपघातांमध्ये धावत्या लोकलमधून पडणाऱ्यांची सर्वाधिक संख्या आहे. प्रचंड गर्दी, यामुळे दरवाज्याजवळ लटकून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.
रेल्वे रूळ ओलांडताना देखील अनेक अपघात झाले आहेत. भुयारी मार्ग, पूल असुनही अनेक जण वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडतात.