Ruchika Jadhav
हौसमौज पूर्ण करत लग्न करण्याचं स्वप्न प्रत्येक जोडपं पाहतं.
मात्र लग्नामध्ये भरमसाठ पैसे लागतात. जेवणापासून, कपडे, डीजे असे सर्वच लहान मोठे खर्च असतात.
लग्नासाठी काही बँका कर्ज देतात. ५०,००० ते २० लाखांपर्यंतचं कर्ज यावेळी घेता येतं.
SBI, HDFI आणि PNB या बँका लग्नासाठी कर्ज देतात.
हे कर्ज फेडण्यासाठी १२ ते ६० महिन्यांची मूदत मिळते.
कर्जाचा लाभ घेण्यासाठी तुमचा CIBIL स्कोर ७०० पेक्षा जास्त असायला हवा.
लोनसाठी प्रोसेसिंग फी २.५० टक्के आकारली जाते.
लग्नासाठी कर्ज घेण्यासाठी तुम्हाला वयाची अट असून तुमचं वय २१ असणे गरजेचं आहे.