Surabhi Jayashree Jagdish
पाल घरात येण्यासाठी अगदी लहान जागांचाही वापर करू शकते. त्यामुळे सर्वात आधी दरवाजे, खिडक्या, व्हेंटिलेशन आणि भिंतींच्या आसपास असलेल्या फटी तपासा. या फटी कॉक किंवा योग्य सीलंटने बंद करा आणि खिडक्या-दरवाज्यांच्या जाळ्या फाटल्या असतील तर त्या दुरुस्त करा.
पाल घरात येण्यासाठी अगदी लहान जागांचाही वापर करू शकते. त्यामुळे सर्वात आधी दरवाजे, खिडक्या, व्हेंटिलेशन आणि भिंतींच्या आसपास असलेल्या फटी तपासा. या फटी कॉक किंवा योग्य सीलंटने बंद करा आणि खिडक्या-दरवाज्यांच्या जाळ्या फाटल्या असतील तर त्या दुरुस्त करा.
घरात पाल अशा जागा शोधते, जिथे ती माणसांच्या नजरेपासून दूर राहू शकते. सामानाने भरलेली कपाटं, जुन्या डब्यांचे ढीग आणि खोलीतील अंधारे कोपरे ही पालींची लपण्याची ठिकाणं असू शकतात. याशिवाय फर्निचरच्या खाली असलेल्या जागेतही पाल लपून बसू शकते.
घरात अनेक दिवसांपासून पडून असलेलं सामान आणि अनावश्यक वस्तूंचे ढीग स्वच्छ करा. वापरात नसलेल्या वस्तू काढून टाकल्यामुळे पालींना लपण्यासाठी मिळणाऱ्या जागा कमी होतील. तसंच घरातील भिंती आणि कोपऱ्यांमध्ये असलेल्या फटी किंवा इतर प्रवेशाच्या जागाही सहज लक्षात येतील.
पाली फक्त घरातील अस्वच्छतेमुळे येतात असं नाही, तर घराबाहेरील वातावरणही त्यांना आकर्षित करतं शकतं. घराच्या भिंतीजवळ किंवा पायाजवळ वाढलेली दाट झाडं आणि झुडपं त्यांना सावली आणि सुरक्षित जागा देतात. त्यामुळे घराभोवतीची दाट झुडपं वेळोवेळी कापून घ्या आणि सुकलेली पानं तसेच कचऱ्याचे ढीग हटवा.
पाली अनेकदा अन्नाच्या शोधात घरात येतात आणि घरात छोटे कीटक जास्त असतील तर त्यांच्यामागे पालीही येऊ शकतात. त्यामुळे अन्नपदार्थ आणि कचरा उघडा ठेवू नका, जेवणानंतर जमिनीवर पडलेले अन्नाचे कण स्वच्छ करा आणि घराची नियमित साफसफाई करा.
पालींना पळवण्यासाठी लसूण, कांदा, व्हिनेगर आणि मिरची यांसारख्या तीव्र वासाच्या पदार्थांचा वापर करण्याचे अनेक घरगुती उपाय सांगितलं जातात. मात्र अशा उपायांमुळे प्रत्येक वेळी पाल घरातून पळेलच असं नाही, त्यामुळे केवळ या उपायांवर अवलंबून राहू नका.