Manasvi Choudhary
बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, वाढता मानसिक ताणतणाव यामुळे आजकाल लिव्हर खराब होण्याची किंवा कमकुवत होण्याची समस्या वेगाने वाढत आहे.
ही समस्या केवळ वृद्धांमध्येच नाही, तर आजकाल तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागली आहे.सुरूवातीला ही लक्षणे स्पष्ट दिसत नसली तरी वैद्यकीय सल्ला घेऊन तुम्ही वेळीच ओळखू शकता.
सुरुवातीच्या काळात लिव्हरशी संबंधित आजारांची लक्षणे स्पष्टपणे दिसत नसली तरी डोळे आणि इतर काही बदलांच्या गंभीर संकेत देतात.
जर डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसत असेल तर ते सामान्य नसून शरीरातील बिलिरूबिन नावाची द्रव वाढल्याचे लक्षण असू शकते.
जेव्हा तुमचे लिव्हर योग्यरित्या काम करत नाही तेव्हा शरीरात हा द्रव साचून राहतो आणि यामुळे डोळे पिवळे दिसतात.
डोळ्यांमधील हा बदल कावीळ, फॅटी लिव्हर याचे कारण देखील असू शकतो यामुळे त्वचा देखील पिवळी होते. लघवीचा रंग बदलणे, अशक्तपणा या समस्या उद्भवतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.