Red Fort History: लाल किल्ल्याशी संबंधित 'या' गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहेत

Dhanshri Shintre

लाल किल्ला

दिल्लीतील लाल किल्ला मुघलांच्या काळातील भव्य वास्तू असून, लाल वाळूच्या दगडांनी बांधलेला हा युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे.

किला-ए-मुबारक

किला-ए-मुबारक म्हणून ओळखला जाणारा लाल किल्ला अनेक सुंदर राजवाडे, घुमटदार वास्तू आणि भव्य मशिदीने भरलेला आहे.

मुघल सम्राट शाहजहा

मुघल सम्राट शाहजहानने लाल किल्ला बांधून त्याला आपल्या राजधानी शाहजहानाबादमधील राजवाड्याचे स्थान दिले.

बांधकाम

लाल किल्ला त्याच्या भव्य भिंतींसाठी ओळखला जातो. १६३८ ते १६४८ या दहा वर्षांत याचे बांधकाम पूर्ण झाले.

नहर-ए-बगीश्त

इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, लाल किल्ल्यात नहर-ए-बगीश्त नावाचा कालवा होता, ज्याला स्वर्गाची नदी म्हणत, त्याचे पाणी यमुनामध्ये येत असे.

सुंदर संगम

लाल किल्ल्याच्या स्थापत्यकलेत इस्लामिक, पर्शियन, तैमुरी आणि हिंदू शैलींचे सुंदर संगम पाहायला मिळतो.

रंग महाल

लाल किल्ल्यातील महत्त्वाच्या इमारतींमध्ये दिवाण-ए-खास (शाह महाल), दिवाण-ए-आम आणि रंग महाल (इम्तियाज महल) यांचा समावेश आहे.

लष्करी निवासस्थानं

कमी लोकांना माहीत आहे की लाल किल्ल्यात ब्रिटीश सैनिकांसाठी अनेक लष्करी निवासस्थानं देखील बांधण्यात आली होती.

NEXT: औरंगाबादची शान, मुघल काळातील भव्य वास्तुकला बीबी का मकबराचा इतिहास जाणून घ्या

येथे क्लिक करा