Bibi Ka Maqbara: औरंगाबादची शान, मुघल काळातील भव्य वास्तुकला बीबी का मकबराचा इतिहास जाणून घ्या

Dhanshri Shintre

52 दरवाजे असलेले शहर

औरंगाबादला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणतात आणि '52 दरवाजे' असलेले शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे, ज्यामुळे त्याची खास ओळख आहे.

बीबी का मकबरा

औरंगाबादमधील बीबी का मकबरा हे स्मारक औरंगजेबाने आपल्या आई रबिया-उल-दुरानी यांच्या सन्मानार्थ उभारलेले एक ऐतिहासिक वास्तुशिल्प आहे.

दक्षिणेचा ताजमहाल

हा मुघल स्थापत्यशास्त्रातील एक सुंदर नमुना असून, ताजमहालसारखा भव्य आहे, त्यामुळे याला 'दक्षिणेचा ताजमहाल' म्हणूनही ओळखले जाते.

नक्षीकाम

संगमरवरी नक्षीकाम, मनमोहक बाग आणि सुंदर कोरलेले प्रवेशद्वार हे बीबी का मकबर्याच्या प्रमुख आकर्षणांपैकी आहेत.

शिलालेख

मुख्य दरवाज्यावरच्या शिलालेखानुसार, बीबी का मकबरा वास्तुविशारद अता-उल्ला आणि अभियंता हंसपत राय यांनी रचलेला आहे.

कधी बांधला?

बीबी का मकबरा बांधण्याचा अंदाजे काळ १६५७ ते १६६१ या वर्षांदरम्यान मानला जातो.

वास्तुकला

बीबी का मकबरा ताजमहालची प्रतिकृती असून, मुघल वास्तुकलेतील भव्यतेचे सुंदर दर्शन घडवतो.

खर्च किती?

बीबी का मकबरा बांधण्यासाठी त्या काळात सात लाख रुपये खर्च झाले, तर आजच्या किंमतीत तुलना करायची असेल तर त्याची किंमत सुमारे 3.20 कोटी रुपये आहे.

NEXT: गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि खास 10 मनोरंजक तथ्ये

येथे क्लिक करा