Dhanshri Shintre
मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया हे ऐतिहासिक ठिकाण पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक दरवर्षी येथे भेट देतात.
गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतलं प्रसिद्ध स्मारक असून, भारताच्या प्रवेशद्वाराचं प्रतीक मानलं जातं.
किंग जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या भारतातील भेटीच्या स्मृतीसाठी गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आले होते.
गेटवे ऑफ इंडियाचा पाया १९११ मध्ये रचला गेला आणि १९१४ मध्ये जॉर्ज विटेट यांनी अंतिम रचना पूर्ण केली.
गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम १० वर्षांच्या काळात पूर्ण झाले असून, १९२४ साली ते पूर्ण झाले.
गेटवे ऑफ इंडिया बेसाल्ट दगडांनी बनवले आहे आणि त्याची उंची सुमारे ८५ फूट आहे.
गेटवे ऑफ इंडिया समुद्रकिनाऱ्याजवळ स्थित असून, ते समुद्रातून येणाऱ्या लोकांचे शहरात स्वागत करण्यासाठी बांधले आहे.
गेटवे ऑफ इंडिया मजबूत दगडांपासून बनलेले असून, वादळांना तोंड देत मुंबईची सुरक्षितता दर्शवते.
गेटवे ऑफ इंडियाचे सौंदर्य रात्री खुलून दिसते, तेव्हा त्यावर रंगीबेरंगी दिवे लावले जातात.