ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नवरा बायकोचं नात हे खूप नाजूक असतं. यांच्यातील संवादाचा त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत असतो.
पती पत्नीमध्ये नेहमी सकारात्मक संवाद झाला पाहिजे. हे नवऱ्याच्या हृदयासाठी चांगले असते.
तुम्हाला माहित आहे का, पत्नीसोबत सकारात्मक संवाद साधणाऱ्या नवऱ्याला हार्ट अटॅकचा धोका कमी असतो.
एका संशोधनात मध्यम वयोगटातील २८१ लोकांवर अभ्यास करण्यात आला. त्यामधून एक महत्वाची बाब समोर आली आहे.
नवरा बायकोच्या नकारात्मक संवादामुळे हृदयावर परिणाम होतो. यामुळे कॅरोटिड आर्टरी अरुंद होते.
कॅरोटिड आर्टरी ही मानेद्वारे मेंदूला रक्तुरवठा करणारी रक्तवाहिनी आहे.
जर कॅरोटिड आर्टरीवर परिणाम झाला तर हृदयाशी संबधित आजारांचा धोका कमी होतो.