Shruti Vilas Kadam
तुमचे ओठ कोरडे असतील तर मॉइश्चरायझिंग घटक असलेला लिपग्लॉस निवडा. तेलकट किंवा नॉर्मल ओठांसाठी हलका, नॉन-स्टिकी लिपग्लॉस योग्य ठरतो.
लिपग्लॉसमध्ये व्हिटॅमिन ई, शिया बटर, जोजोबा ऑइल किंवा एलोवेरा असलेले घटक असतील तर ओठांना पोषण मिळते. पॅराबेन्स आणि केमिकल्स असलेले लिपग्लॉस टाळावेत.
खूप चिकट (Sticky) लिपग्लॉस वापरायला अस्वस्थ वाटतो आणि धूळ-माती ओठांवर चिकटते. त्यामुळे हलका आणि स्मूथ टेक्सचर असलेला लिपग्लॉस निवडा.
तुमच्या स्किन टोनला शोभेल असा शेड निवडणं महत्त्वाचं आहे. डेली वापरासाठी न्यूड किंवा पिंक शेड्स तर पार्टीसाठी ब्राइट आणि शिमरी शेड्स उत्तम ठरतात.
वारंवार लिपग्लॉस लावायचा कंटाळा येत असेल तर जास्त वेळ टिकणारा लिपग्लॉस निवडा. मात्र लाँग-लास्टिंग असतानाही ओठ कोरडे होणार नाहीत याची खात्री करा.
सूर्याच्या हानिकारक किरणांपासून ओठांचं संरक्षण करण्यासाठी SPF असलेला लिपग्लॉस फायदेशीर ठरतो, विशेषतः बाहेर जास्त वेळ राहणाऱ्यांसाठी.
नेहमी विश्वासार्ह ब्रँडचा लिपग्लॉस खरेदी करा आणि त्याची एक्सपायरी डेट नक्की तपासा. एक्सपायर्ड लिपग्लॉस ओठांसाठी हानिकारक ठरू शकतो.