Lip Care: केमिकल नको, घरगुती सामग्रींनी घरीच बनवा लिप बाम; या थंडीत ड्राय ओठांपासून ३ दिवसात मिळेल सुटका

Shruti Vilas Kadam

बीट लिप बाम

चुकंदराचा रस काढून त्यात थोडं एलोवेरा जेल, गुलाबजल आणि नारळतेल मिसळा. हे मिश्रण एका छोट्या डब्यात साठवा. या लिप बाममुळे ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग आणि ओलावा मिळतो.

Lip Care

नारळतेल आणि वॅसलीन लिप बाम

एक चमचा वॅसलीन आणि एक चमचा नारळतेल घेऊन चांगलं मिसळा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास ओठ मऊ आणि चमकदार राहतात.

Lip Care | Saam Tv

शिया बटर लिप बाम

थोडं शिया बटर गरम करून त्यात नारळतेल आणि बीटचा रस घाला. थंड झाल्यावर हे मिश्रण लिप बामसारखं वापरा. हा लिप बाम नैसर्गिक मॉइश्चरायझर असून ओठांना गुलाबी चमक देतो.

Lip Care | Saam tv

कोकोआ बटर लिप बाम

कोकोआ बटर वितळवून त्यात थोडं नारळतेल आणि लिंबाच्या एसेंशियल ऑइलचे काही थेंब मिसळा. हे मिश्रण सेट झाल्यावर वापरा. हा बाम ओठांच्या त्वचेला पोषण देतो आणि कोरडेपणा कमी करतो.

Lip Care | Saam Tv

गुलाबाच्या पाकळ्याचे लिप बाम

गुलाबाच्या ताज्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात थोडं नारळतेल आणि वॅसलीन मिसळा. हा लिप बाम ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग आणि सुगंध देतो.

Lip Care | Saam Tv

हिवाळ्यात ओठांच्या काळजीसाठी उपयुक्त

थंड हवेने ओठ फाटणे ही सामान्य समस्या आहे. घरच्या घरी बनवलेले हे लिप बाम नैसर्गिक घटकांनी बनले असल्याने ओठांना दीर्घकाळ ओलावा देतात आणि त्यांना सॉफ्ट ठेवतात.

Lip Care | Saam Tv

लिप बाम वापरण्याची योग्य पद्धत

बनवलेला लिप बाम स्वच्छ छोट्या कंटेनरमध्ये ठेवा. दिवसातून दोन ते तीन वेळा लावा, विशेषतः झोपण्यापूर्वी. नियमित वापराने ओठ नैसर्गिकपणे मऊ, गुळगुळीत आणि आकर्षक दिसतील.

Lip Care | Saam Tv

Husband-Wife Relationship: तुमच्या पतीला कधीही या 5 गोष्टींवरुन टोमणे देऊ नका, नाहीतर येईल नात्यात दुरावा

Husband Wife | freepik
येथे क्लिक करा