Shruti Vilas Kadam
बीट आणि गुलाब पाण्याचा लिप बाम बनवण्यासाठी थोडे बीट, एक चमचा गुलाब पाणी आणि एक चमचा पेट्रोलियम जेली किंवा बीवॅक्स घ्या.
बीट स्वच्छ धुऊन त्याची साल काढा. त्याचे छोटे तुकडे करून किसून घ्या आणि स्वच्छ कपड्याने किंवा गाळणीने त्याचा रस काढा. हा रस ओठांना हलका गुलाबी रंग देण्यासाठी वापरता येतो.
बीटच्या रसामध्ये थोडे गुलाब पाणी मिसळा. यामुळे मिश्रण नीट तयार होतं. पण, गुलाबपाणी जास्त घेऊ नका.
एका स्वच्छ भांड्यात पेट्रोलियम जेली किंवा बीवॅक्स हलके गरम करून मऊ करा. त्यात बीट रस आणि गुलाब पाण्याचे काही थेंब घाला. लक्षात ठेवा, पाणी आणि तेलकट पदार्थ सहज एकत्र मिसळत नाहीत.
सर्व साहित्य चमच्याने व्यवस्थित मिसळा. मिश्रण खूप पातळ होत असेल, तर त्यात योग्य प्रमाणात बीवॅक्स किंवा पेट्रोलियम जेली वापरा.
तयार मिश्रण स्वच्छ, कोरड्या डबीत भरा. त्यात पाणी असल्यामुळे तो बराच काळ टिकेलच असे नाही. त्यामुळे कमी प्रमाणात तयार करा आणि दुर्गंधी, रंग किंवा पोत बदलल्यास वापरू नका.
लिप बाम वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर टेस्ट करा. ओठांवर जखमा किंवा भेगा असतील, तर या लिप बामचा वापर करा.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.