Mahad Fort : पावसाळ्यात महाडला जाताय? मग न विसरता करा 'या' ऐतिहासिक किल्ल्यावर भटकंती

Shreya Maskar

रायगड-महाड

लिंगाणा किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगेतील २,९६९ फूट उंचीचा एक भव्य खडकाळ सुळका आहे. हा किल्ला महाड तालुक्यात रायगड आणि तोरणा किल्ल्यांच्या दरम्यान वसलेला आहे.

Raigad-Mahad | google

लिंगाणा किल्ला

लिंगाणा किल्ला मुंबईपासून साधारण १२०-१३० किमी अंतरावर आहे. हा किल्ला ट्रेकिंगसाठी कठीण मानला जातो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे पर्यटक आवर्जून येतात.

Lingana Fort | google

किल्ल्याचा आकार

लिंगाणा किल्ला हा सह्याद्रीतील सर्वात आव्हानात्मक आणि धोकादायक रॉक-क्लायंबिंग ट्रेक्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. लिंगाणा किल्ला हा पवित्र शिवलिंगासारखा दिसत असल्याने त्याला 'लिंगाणा' हे नाव पडले आहे.

The size of the fort | google

इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४८ मध्ये लिंगाणा किल्ल्याची उभारणी केली. याचा उद्देश मध्य कोकण प्रदेशाचे जंजिऱ्याच्या सिद्दींपासून रक्षण करणे हा होता.

History | google

कसं जाल?

मुंबई, ठाणे किंवा कल्याण येथून महाडसाठी एसटी आणि खाजगी बस जातात. त्याने प्रवास करा. महाडहून पाणे गावापर्यंत जाण्यासाठी स्थानिक एसटी बस पकडा. पाणे हे या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.

how do you go | google

ट्रेकिंगचा थरार

पाणे गावापासून 'माची'पर्यंत (सुळक्याचा पायथा) पोहोचण्यासाठी साधारण १-२ तासांचा ट्रेक करावा लागतो. हे ट्रेकिंग खूप खतरनाक आहे.

trekking | google

कारागृहासारखा वापर

मराठा साम्राज्याच्या काळात किल्ल्याच्या दुर्गमतेमुळे याचा वापर एक अत्यंत सुरक्षित कारागृह म्हणून केला जात असे. कैद्यांना खडकात कोरलेल्या अंधाऱ्या कोठड्यांमध्ये ठेवले जात असे.

Maratha Empire | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : रणनीती, इतिहास अन् सागरी वैभवाचा संगम; मालवणमध्ये लपलाय भव्य किल्ला

Malvan Fort | saam tv
येथे क्लिक करा...