Saam Tv
हेलमेट बनवणाऱ्या कंपन्या आणि सुरक्षा संस्था रोजच्या नियमित वापरानंतर सुमारे 3-5 वर्षांत हेलमेट बदलण्याचा सल्ला देतात.
हेलमेटचे आयुष्य हे फक्त ते खरेदी केलेल्या तारखेवर नाही, तर तुम्ही ते कसे वापरता, त्याची काळजी कशी घेता यावर अवलंबून असते.
सामान्य वापरासाठी कमाल मुदत ३ ते ५ वर्षे तसेच, ५ वर्षांनंतर हेल्मेटच्या आतील सुरक्षा घटक कमकुवत होतात. ऊन, पाऊस आणि घाम यामुळे आतील फोमची गुणवत्ता वेगाने घसरते.
लहान किंवा मोठ्या अपघातात टक्कर लागल्यास ईपीएस (EPS) फोम दाबला जातो आणि धक्का शोषून घेतो. एकदा दबलेला फोम दुसऱ्या अपघातात डोक्याचे संरक्षण करू शकत नाही.
सततच्या वापराने हेल्मेटच्या आतील स्पंज चपटा होतो. त्यामुळे गाडी चालवताना हेल्मेट हलल्यास दृष्टी बाधित होऊ शकते.
हेल्मेटच्या फायबर किंवा प्लास्टिकवर बारीक क्रॅक असल्यास हेल्मेटची सुरक्षा कमी होते. त्यावेळी हेल्मेट बदलणे गरजेचे आहे.
लॉक अचानक उघडल्यास अपघाताच्या वेळी हेल्मेट डोक्यावरून उडून जाते. त्यावेळी पट्ट्याची ताकद संपली असल्यास तो बदलणे किंवा नवीन हेल्मेट घेणे आवश्यक आहे.
नवीन हेल्मेट घेताना ISI मार्क तपासा, अचूक आकार व फिटिंग, निर्मितीची तारीख, मजबूत लॉक सिस्टीम नक्की तपासा