Home Hacks : प्लॅस्टिकची बादलीवरील खार्‍या पाण्याचे डाग काढण्याचे सोपे घरगुती उपाय

Saam Tv

बादलीवर डाग कशामुळे पडतात

घरातील खार्‍या पाण्यामुळे या बादल्यांवर पांढऱ्या-पिवळसर रंगाची पपडी किंवा डाग जमा होऊ लागतात.

How to clean a plastic bucket | pinterest

खनिजांचे डाग

खार्‍या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे खनिजे असतात, ज्यामुळे हे जिद्दी डाग पडतात.

How to clean a plastic bucket | pinterest

सोपी पद्धत

व्हाइट व्हिनेगर, बेकिंग सोडा, लिंबू आणि सायट्रिक ॲसिड यांच्या मदतीने हे डाग तुम्ही अगदी ५ मिनिटांत स्वच्छ करू शकता. जाणून घ्या या सोप्या पद्धती

How to clean a plastic bucket | pinterest

खार्‍या पाण्याचे डाग काढण्याचे सोपे उपाय

डाग साध्या साबणाने किंवा डिटर्जंटने कितीही घासले तरी सहज निघत नाहीत.

How to clean a plastic bucket | pinterest

पांढरा व्हिनेगरआणि बेकिंग सोडा

2 चमचे बेकिंग सोडा आणि १/२ कप पांढरा व्हिनेगर एकत्र करून त्याची पेस्ट डाग असलेल्या ठिकाणी लावा. त्यानंतर हलक्या हाताने स्क्रबरने घासून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

How to clean a plastic bucket | pinterest

लिंबू आणि मीठ

एक लिंबू अर्धा कापून घ्या आणि त्यावर मीठ टाका. लिंबू बादलीवरील पांढऱ्या-पिवळ्या डागांवर चांगल्या प्रकारे रगडा. १० मिनिटांनंतर बादली स्क्रबरने घासून पाण्याने स्वच्छ धुवा.

How to clean a plastic bucket | pinterest

सायट्रिक ॲसिडचा वापर

बादलीत थोडे कोमट पाणी घ्या. त्यात सायट्रिक ॲसिड पावडर टाका आणि ती पाण्यात नीट विरघळवून बादली घासून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

How to clean a plastic bucket | pinterest

बादली खार्‍या पाण्याच्या डागांपासून कशी वाचवावी?

बादली वापरल्यानंतर नेहमी ती उलटी करून ठेवा. तसेच बादली आणि मगमध्ये सतत पाणी साचवून ठेवणे टाळा.

How to clean a plastic bucket | pinterest

NEXT : सकाळी दिसणारी हार्ट अटॅकची 6 महत्त्वाची पूर्वलक्षणे कधीही दुर्लक्ष करू नका

HEART ATTACK SYMPTOM | SAAM TV
येथे क्लिक करा