Saam Tv
सकाळी उठल्यानंतर शरीरात दिसणारी हार्ट अटॅकची 6 प्रमुख पूर्वलक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.
सकाळी उठल्यावर छातीवर प्रचंड दडपण येणे, आवळल्यासारखे वाटणे, जडपणा किंवा वेदना होणे.
कोणतेही शारीरिक कष्ट किंवा उष्णता नसताना पहाटे किंवा सकाळी अचानक थंड घाम येणे.
सकाळी उठल्यावर साधे बसलेले असतानाही धाप लागणे किंवा खोल श्वास घेता न येणे.
वेदना फक्त छातीतच नाही, तर डाव्या हातात, खांद्यात, मान, जबडा किंवा पाठीच्या वरच्या भागात पसरणे.
पुरेशी झोप झाल्यानंतरही सकाळी उठल्यावर प्रचंड थकवा जाणवणे किंवा डोक्याला गरगरणे/चक्कर येणे.
सकाळी उठल्यावर मळमळणे, उलटीसारखे वाटणे किंवा पोटात गॅस/एसिडिटी झाल्यासारखी जळजळ होणे. विषेशत: महिलांमध्ये.
सकाळी उठल्यावर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणालाही ही लक्षणे तीव्रतेने जाणवत असतील, तर ॲसिडिटी किंवा सामान्य थकवा समजून वेळ वाया घालवू नका. तात्काळ वैद्यकीय मदत घ्या किंवा जवळच्या रुग्णालयात संपर्क साधा.
NEXT : सुरक्षित, आदरयुक्त आणि प्रेमळ, तुमचं नातं 'हेल्दी' असल्याची ही आहेत 7 लक्षणे