Saam Tv
गोळी खाताना तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पीत आहात का? थोड्याशा निष्काळजीपणामुळे औषधाचा प्रभाव कमी होऊ शकतो.
अनेकदा लोक लहान गोळी सहज गिळण्यासाठी अगदी थोडं किंवा अजिबात पाणी पीत नाहीत. मात्र, गोळी लहान असो वा मोठी, पुरेशा पाण्याशिवाय ती पोटात व्यवस्थित पोहोचत नाही.
डॉक्टरांच्या मते, कोणतीही गोळी किंवा कॅप्सूल घेताना कमीत कमी 1 पूर्ण ग्लास पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे.
कमी पाण्यासोबत गोळी घेतल्यास ती अन्ननलिकेत किंवा घशात अडकू शकते. यामुळे छातीत जळजळ, जखम किंवा तीव्र त्रास होऊ शकतो.
औषध पोटापर्यंत सहज पोहोचावे आणि शरीरात व्यवस्थित विरघळून त्याचे योग्य परिणाम मिळावेत, यासाठी पुरेसे पाणी मदत करते.
अनेक जण चहा, कॉफी, दूध किंवा फळांच्या ज्यूससोबत औषध घेतात. असे केल्याने औषधातील घटक आणि पेयातील केमिकल्सची प्रक्रिया होऊन दुष्परिणाम होऊ शकतात.
कधीही झोपलेल्या अवस्थेत गोळी खाऊ नका. नेहमी सरळ बसून किंवा उभे राहूनच औषध घ्यावे, जेणेकरून ते थेट पोटात जाईल.
पुढच्या वेळी कोणतीही गोळी घेताना १ ग्लास साधे पाणी पिण्यास विसरू नका. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि योग्य पद्धतीनेच औषधे घ्या!