lemon peel Uses : लिंबाची साल कचरा समजून फेकू नका! झाडांसाठी आणि गार्डनसाठी अशी ठरेल वरदान

Saam Tv

झाडांना कीटक आणि मुंग्यांपासून दूर ठेवेल

कुंडीतील झाडांना पांढरी माशी किंवा मुंग्या लागल्यास लिंबाच्या साली पाण्यात उकळून घ्या आणि ते पाणी थंड करुन स्प्रे बाटलीत भरून झाडांवर फवारा. लिंबाच्या वासामुळे कीटक दूर होतील.

lemon peels used | pinterest

कुंडीतील मातीला पोषण देईल

लिंबाच्या सालींमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात. त्यामुले लिंबांच्या सालींचे छोटे-छोटे तुकडे करून मातीत मिसळा.

lemon peels used | pinterest

खत (कम्पोस्ट) बनवण्यासाठी उपयुक्त

घरात ओल्या कचऱ्यापासून खत बनवत असाल, तर त्यात लिंबाच्या सालीही टाकू शकता. या इतर सेंद्रिय कचऱ्यासोबत हळूहळू कुजतात आणि कम्पोस्टिंग प्रक्रियेचा भाग बनतात.

lemon peels used | pinterest

मुंग्यांपासून संरक्षण

ज्या ठिकाणी वारंवार मुंग्या येतात, तिथे लिंबाच्या साली ठेवल्या जाऊ शकतात. विशेषतः झाडांच्या आसपास किंवा मुंग्यांची ये-जा जास्त असलेल्या ठिकाणी.

lemon peels used | pinterest

खताचा दुर्गंध कमी करेल

घरी खत तयार करताना दुर्गंध येतो. अशा वेळी खतात लिंबाच्या काही साली मिसळू शकता. यामुळे खताचा दुर्गंध कमी होण्यास मदत होते.

lemon peels used | pinterest

बागेला देईल ताजा सुगंध

बाग किंवा बाल्कनीमधील बसण्याची जागा ताजी आणि सुगंधीत ठेवण्यासाठी लिंबाच्या साली पाण्यात उकळून ते पाणी थंड करून घ्या. त्याच्या सुगंधामुळे वातावरण प्रसन्न राहिल.

lemon peels used | pinterest

गार्डनिंग टूल्सची स्वच्छता

झाडांची छाटणी करताना स्वच्छ औजारांचा वापर करणे गरजेचे असते. लिंबाच्या सालीने औजारे घासून साफ करा आणि नंतर पाण्याने धुवून नीट वाळवून घ्या.

lemon peels used | pinterest

लिंबाच्या साली वापरताना या गोष्टींची काळजी घ्या:

  • लिंबाच्या साली झाडांच्या मातीत टाकताना नेहमी कमी प्रमाणापासून सुरुवात करा.

  • जर कम्पोस्टमध्ये टाकत असाल तर इतर सेंद्रिय कचऱ्यासोबत व्यवस्थित मिसळा.

  • लिंबाच्या साली झाडाच्या मुळांच्या अगदी जवळ किंवा खूप जास्त प्रमाणात थेट टाकू नका, त्यातील सायट्रिक घटकांचा मातीवर परिणाम होऊ शकतो.

lemon peels used | pinterest

NEXT : Salt water: सकाळी उठल्यावर प्या एक ग्लास मीठाचं पाणी; मिळतील 4 जबरदस्त फायदे

Salt water | SAAM TV
येथे क्लिक करा