High cholesterol symptoms : कॉलेस्ट्रॉल प्रचंड वाढलाय का? 20 धोक्याचे इशारे वेळीच ओळखा

Saam Tv

लक्षणे

शरीरात कोलेस्टेरॉलची मात्रा खूप वाढल्यास किंवा त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास खालील लक्षणे किंवा धोक्याचे इशारे दिसू शकतात.

high cholesterol symptoms | pinterst

त्वचेवर पिवळसर थर किंवा गाठी

कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास, हातावर, कोपरांवर, गुडघ्यांवर किंवा त्वचेखाली पिवळसर रंगाच्या गाठी तयार होऊ शकतात.

high cholesterol symptoms | pinterest

डोळ्यांच्या आसपास पिवळसर डाग

डोळ्यांच्या पापण्यांवर किंवा आजूबाजूला पिवळसर चरबीचे पॅचेस दिसू शकतात.तसेच, बुबुळाच्या कडेने पांढरट किंवा पिवळसर रंगाचे वर्तुळ तयार होणे.

high cholesterol symptoms | pinterest

छातीत दुखणे

रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचल्यामुळे हृदयाला पुरेसे रक्त न मिळाल्यास छातीत दुखू शकते. किंवा हृदयावर ताण आल्यामुळे चालताना किंवा आरामात असताना दम लागल्यासारखे वाटू शकते.

high cholesterol symptoms | pinterest

सतत थकवा जाणवणे

  • शरीरातील अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे न झाल्यास पुरेशी विश्रांती घेऊनही सतत थकवा जाणवू शकतो.

  • रक्तप्रवाह मंदावल्यामुळे हात किंवा पायांची टोके सतत थंड पडू शकतात. तसेच, चालताना पायांच्या स्नायूंमध्ये दुखणे.

high cholesterol symptoms | pinterest

अशक्तपणा किंवा सुन्न पडणे

रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे हात,पाय किंवा शरीराचा एखादा भाग सुन्न पडणे किंवा मुंग्या येतात.त्याचबरोबर,मेंदूला रक्तपुरवठा योग्य प्रकारे न झाल्यामुळे अचानक चक्कर आल्यासारखे वाटू शकते.

high cholesterol symptoms | pinterest

सतत किंवा वारंवार होणारी डोकेदुखी

अरुंद झालेल्या रक्तवाहिन्यांमुळे व्हॅस्कुलर बदलांमुळे डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते.रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे पायांची त्वचा फिकट किंवा निळसर पडू शकते.

high cholesterol symptoms | pinterest

नखे मंद गतीने वाढणे किंवा पायावरचे केस गळणे

पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आल्यास पायांवरचे केस गळणे आणि नखांची वाढ मंदावणे असे प्रकार घडतात. रक्ताभिसरण बिघडल्यामुळे शरीरावरील जखमा बरी होण्यास खूप जास्त वेळ लागणे.

high cholesterol symptoms | pinterest

अचानक अर्धांगवायूची लक्षणे

शरीराच्या एका बाजूला अचानक अशक्तपणा जाणवणे किंवा सुन्न होणे.मेंदूतील रक्तप्रवाहात अडथळा आल्यास बोलताना शब्द स्पष्ट न उच्चारता येऊ शकतात.

high cholesterol symptoms | pinterest

उच्च रक्तदाब

  • कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्या कडक होतात, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.

  • स्ट्रोक किंवा मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या समस्येमुळे अचानक तीव्र डोकेदुखी उद्भवू शकते.तसेच, अचानक डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा दृष्टी कमजोर होणे.

high cholesterol symptoms | pinterest

प्रतिबंध आणि उपाय:

  • वयाच्या ३० नंतर किंवा वर्षातून एकदा ब्लड टेस्ट करणे सर्वात सुरक्षित ठरते.

  • सॅचुरेटेड फॅट्स, प्रक्रिया केलेले अन्न आणि तळलेले पदार्थ टाळा.

  • नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि धूम्रपान टाळल्याने कोलेस्टेरॉल नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवता येते.

high cholesterol symptoms | pinterest

NEXT : वजन कमी करण्यासाठी काय खावं, काय टाळावं? आहारतज्ज्ञांचा सल्ला एकदा वाचा

Weight Loss Food | Saam Tv
येथे क्लिक करा