Saam Tv
मुघलकाळ हा १५२६ पासून १८५७ पर्यंत होता असे मानले जाते.
मुघल बादशहाच्या विवाहाबद्दल बोलायचे झाले तर ते मुघल, राजपूत, पारसी, तुर्की राजकुमारी यांच्याशी विवाह करत.
मुघल सम्राटांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राण्यांचे जीवनाविषयी इतिहासात फारसा तपशीलवार उल्लेख नाही, पण उपलब्ध माहितीच्या आधारे आपण काही गोष्टी सांगू शकतो. ही माहिती विकीपीडीयावर उपलब्ध आहे.
मुघल सम्राटांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राण्यांना पर्दा पद्धत काटेकोरपणे पाळावी लागत असे.
पुर्वी मुघलांच्या राण्या आग्रा, दिल्ली, लाहोर येथील महालांमध्ये यालाच झनानाखाना म्हणजेच स्त्रियांच्या विभागात राहत असे.
मुघलांच्या राण्यांचे जीवन धार्मिक कार्ये, कुराण पठण, इबादत, दानधर्म, काव्य, संगीत किंवा हस्तकला यामध्ये रमण्यात जायचे. काही वेळेस त्या हेरममध्ये राहायच्या.
अकबरच्या मृत्यूनंतर मरियम-उज्ज-जमानी म्हणजेच जोधाबाईंनी उर्वरित काळ शाही महालात व धार्मिक कार्यात घालवला.
मुमताज महल शाहजहानच्या काळातच निधन पावली त्यामुळे तिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधण्यात आला.
काही राण्यांनी मुलांच्या संरक्षणासाठी राजकीय भुमिका घेतल्या. जसे की, नुरजहानने जहांगीरच्या मृत्यूनंतर काही काळ सत्ता नियंत्रित केली.