Shreya Maskar
तुम्ही जर रोजच्या रुटीन आणि कामामुळे खरंच वैतागला असाल तर महाराष्ट्रातील 'या' ठिकाणांना भेट द्या.
सोलो ट्रिपसाठी तसेच स्वतः सोबत निवांत वेळ घालवण्यासाठी ही सर्वोत्तम ठिकाणे आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील लोणार तलाव निवांत वेळ घालवण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.
लोणार तलावाच्या आजूबाजूला तुम्हाला प्राचीन मंदिरे पाहायला मिळतील.
तुम्हाला सोलो ट्रेकिंगसाठी जायचे असल्यास विक्रमगढला आवर्जून भेट द्या.
विक्रमगढला जाताना तुमची जंगल सफर होईल. तसेच धबधब्याचा आनंद घेता येईल.
निसर्गाच्या सानिध्यात राहून स्वतःचा मूड फ्रेश करायचा असेल तर चिखलदरा उत्तम ठिकाण आहे.
येथील मंद शांतता तुमच्या मनातील कल्लोळ शांत करून तुम्हाला नवी वाट दाखवेल.
गोव्यातील चोराओ हे ठिकाण मनःशांतीसाठी बेस्ट आहे. पक्ष्यांचा किलबिलाट मनाला मोहून टाकेल.
चोराओ हे ठिकाण तुम्ही सायकलवर सहज फिरू शकता.