Shruti Vilas Kadam
अर्धे कापलेले लिंबू एका स्वच्छ एअरटाइट डब्यात ठेवा. यामुळे लिंब्याचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि ते लवकर सुकत नाही.
लिंबाचा कापलेला भाग प्लास्टिक रॅपने व्यवस्थित झाकून ठेवा. यामुळे हवेचा थेट संपर्क कमी होतो आणि लिंबू ताजे राहण्यास मदत होते.
कापलेले लिंबू खोलीच्या तापमानावर जास्त वेळ ठेवू नका. ते झाकून फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे लिंबू लवकर खराब होण्यापासून बचाव होतो.
लिंबू साठवण्यासाठी स्वच्छ आणि कोरडा काचेचा डबा वापरा. डब्याचे झाकण व्यवस्थित बंद करा, जेणेकरून लिंबाचा ताजेपणा टिकून राहील.
लिंबाचा वापर वारंवार होत नसेल, तर त्याचा रस काढून स्वच्छ हवाबंद डब्यात भरा. हा रस फ्रिजमध्ये ठेवा आणि काही दिवसांत वापरा.
लिंबाचा रस जास्त काळ साठवायचा असेल, तर तो आइस क्यूब ट्रेमध्ये भरा. फ्रीजरमध्ये ठेवून त्याचे क्यूब्स तयार करा. गरजेनुसार एक किंवा दोन क्यूब्स वापरता येतात.
फ्रिजमध्ये ठेवलेले कापलेले लिंबू वापरण्यापूर्वी त्याचा रंग, वास आणि पोत तपासा. लिंबावर बुरशी दिसल्यास किंवा विचित्र वास येत असल्यास ते वापरू नका. शक्यतो कापलेले लिंबू लवकर वापरा.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.