Shraddha Thik
लिंबाची पानं
खरतर लिंबाच्या पानांचा आपण वर्षभर उपयोग करू शकतो व त्याचा फायदा घेऊ शकतो.
अनेक आजारांना या पानांच्या मदतीने दूर करू शकतो. आयुर्वेदात याचे खूपच महत्व आहे.
लिंबाचे पान जर हातात घेऊन ते चुरुन किंवा रगडून त्याचा वास घेतला, तर डोकेदुखीमध्ये आराम पडतो. अर्धशिशी, मायग्रेन असेल तर लिंबाच्या पानांचा प्रयोग करून तुम्ही ठीक होऊ शकता.
ही पाने तुमच्या चेहर्यावरील डाग, खड्डे, मुरूमे दूर करण्यासाठी फायदेमंद आहेत. याची छोटी 5 ते 6 पाने घ्या, ती वाटून त्यात मध मिसळून चेहऱ्यावर लावा.
त्वचारोग असेल, खाज, खरूज, नायटा, फोड यांसारख्या संसर्गजन्य रोगाला हे फायदेशीर ठरेल.
ही पाने वाटून पेस्ट बनवा आणि केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मालीश करा. 1 ते 2 वेळा लावल्यामुळे केसातील कोंडा नाहीसा होतो.
त्या पानांचा 10 मिली रस काढून तो ताकात मिसळून त्याचे सेवन करा. 10 ते 12 दिवस हे घेतले तर कावीळ बरी होते. हा काविळीसाठी रामबाण उपाय आहे.