Leg Cramps at Night: रात्री झोपेत अचानक पायात क्रॅम्प्स येतात? 'या' ६ कारणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

Shruti Vilas Kadam

पायांवर जास्त ताण

दिवसभर जास्त चालणे, व्यायाम करणे, बराच वेळ उभे राहणे किंवा स्नायूंचा अतिवापर केल्यामुळे रात्री पायात गोळे येण्याची शक्यता वाढू शकते.

leg cramps at night | SAAM TV

शरीरात पाण्याची कमतरता

डिहायड्रेशनमुळे काही लोकांना रात्री पायात क्रॅम्प्स येऊ शकतात. विशेषतः जास्त घाम येणे, उष्ण हवामान किंवा दिवसभर पुरेसे पाणी न पिणे यामुळे हा त्रास होऊ शकतो. मात्र, प्रत्येक वेळी पाण्याची कमतरताच कारण असेल असे नाही.

Leg Cramps at Night | Google

मिनरल्सचे असंतुलन

पोटॅशियम, मॅग्नेशियम किंवा कॅल्शियमसारख्या इलेक्ट्रोलाइट्सच्या पातळीत असंतुलन झाल्यास स्नायूंमध्ये आकडी येण्याची शक्यता असते. त्यामुळे आहार संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे.

Leg Cramps at Night | Google

जास्त वेळ बसून राहणे

ऑफिसमध्ये किंवा घरात सतत अनेक तास एकाच जागी बसून राहिल्यामुळेही रात्री पायात गोळे येऊ शकतात. नियमित हालचाल आणि हलके स्ट्रेचिंग केल्याने फायदा होऊ शकतो.

Leg Cramps at Night | Google

काही औषधांमुळेही होऊ शकतो त्रास

काही औषधांचा साइड इफेक्ट म्हणून पायात क्रॅम्प्स येऊ शकतात. विशेषतः काही लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे आणि स्टॅटिन्स यांचा संबंध आढळतो. औषध स्वतःहून बंद न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Leg Cramps at Night | SAAM TV

डायबिटीज किंवानर्व्ह डॅमेज संबंधित समस्या

वारंवार पायात गोळे येणे हे काही वेळा मधुमेहामुळे होणारे नर्व्ह डॅमेज, रक्ताभिसरणातील समस्या, किडनीचे आजार किंवा इतर आरोग्य समस्यांशी संबंधित असू शकते.

Leg Cramps at Night | Google

‘ही’ लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

पायात गोळे वारंवार येत असतील, खूप तीव्र वेदना होत असतील किंवा त्यासोबत पायाला सूज, बधिरपणा, अशक्तपणा किंवा त्वचेच्या रंगात बदल दिसत असेल तर वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

Leg Cramps at Night | google

Curly Hair Care Tips: कर्ली केस फ्रिझी होऊ नयेत म्हणून करा 'या' ७ गोष्टी; कर्ल्स दिसतील परफेक्ट आणि सुंदर

Curly Hair Care Tips | Saam Tv
येथे क्लिक करा