Shruti Vilas Kadam
कुरळ्या केसांसाठी सल्फेट-फ्री शॅम्पूचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवण्यास मदत होते आणि केस जास्त कोरडे किंवा फ्रिझी दिसत नाहीत.
शॅम्पूनंतर कंडिशनर लावणे कुरळ्या केसांसाठी महत्त्वाचे आहे. कंडिशनर केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा आणि २ ते ३ मिनिटांनी साध्या पाण्याने धुवा.
कुरळ्या केसांमध्ये मॉइश्चर टिकवण्यासाठी दर १५ दिवसांनी हायड्रेटिंग हेअर मास्क किंवा डीप कंडिशनिंग करता येते. यामुळे केस मऊ आणि अधिक व्यवस्थीत दिसण्यास मदत होते.
कर्ली केस शॅम्पू करण्यापूर्वी विंचरले तर कर्ल्सचा आकार बिघडत नाही. कंडिशनर लावल्यानंतर केस विंचरण्यासाठी रुंद दातांचा कंगवा वापरणे योग्य ठरते.
केस सुकवण्यासाठी साध्या टॉवेलऐवजी मऊ कॉटन टी-शर्ट किंवा मायक्रोफायबर टॉवेल वापरा. केस घट्ट गुंडाळण्याऐवजी हलक्या हाताने पाणी शोषून घ्या.
कुरळ्या केसांसाठी सॅटिन किंवा सिल्कचे उशीचे कव्हर वापरता येते. तसेच केस बांधण्यासाठी सॅटिन किंवा सिल्कचे रबर बँड वापरल्यास केस गुंतणे कमी होते.
कुरळ्या केसांना परफेक्ट शेप देण्यासाठी लीव्ह-इन कंडिशनर किंवा कर्ल क्रीम वापरता येते. यामुळे कर्ल्स अधिक शायनी दिसण्यास मदत होऊ शकते.