Shreya Maskar
चहा गाळल्यानंतर उरलेली चहा पावडर फेकून न देता तिचा त्वचेसाठी आणि केसांसाठी वापर करा.
उरलेली चहा पावडर उकळून त्याच्या पाण्याने केस धुवा.
चहा पावडरच्या पाण्याने केसाला नैसर्गिक चमक येते.
चहामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट केसांच्या कंडिशनिंगसाठी फायदेशीर असतात.
चहा पावडरचे पाणी केस गळती कमी करून टाळू स्वच्छ करते.
चहा पावडरचे पाणी तेलकट केसांसाठी खूप उपयुक्त आहे.
चहा पावडरमध्ये मध, नारळाचे तेल टाकून तयार पेस्ट चेहर्याला लावा.
चहा पावडरच्या पेस्टमुळे टॅनिंग दूर होऊन चेहऱ्याला चमक येते.