Shreya Maskar
साधारणपणे शिजवलेले गोड पदार्थ फ्रिजमध्ये 2-3 दिवस ताजे राहतात. उदा. शिरा, खीर
शिजलेले गोड अन्नपदार्थ फ्रिजमध्ये जास्त काळ ठेवल्याने विषबाधा होण्याचा धोका वाढतो.
दूध असलेली मिठाई फ्रिजमध्ये 2 ते 4 दिवस चांगली राहते.
गोड सुकी मिठाई फ्रिजमध्ये हवाबंद डब्यात 7 ते 10 दिवस राहते. उदा. लाडू
चॉकलेट फ्रिजमध्ये अधिक काळ टिकते. मात्र 6-8 महिन्याच्यावर चॉकलेट फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची गुणवत्ता कमी होते.
फ्रोजन पदार्थ योग्य तापमानात फ्रिजमध्ये ठेवा.
महिनाभर फ्रोजन पदार्थ फ्रिजमध्ये चांगले राहतात. मात्र नंतर त्याचा पोत आणि चव बिघडते.
अन्न खराब होऊ नये म्हणून फ्रिजचा वापर केला जातो, मात्र पदार्थ जास्त काळ ठेवल्यास त्यांची पौष्टिकता आणि स्वादही बिघडतो.