Shreya Maskar
रात्रीचा भात उरला असेल तर झटपट मेदू वडे बनवा.
उरलेल्या भाताचे मेदू वडे बनवण्यासाठी शिजवलेला भात, रवा, दही, मिरपूड, आलं, हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, तांदळाचे पीठ, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
उरलेल्या भाताचे मेदू वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये शिजवलेला भात आणि दही मिक्स करा.
यात रवा, आले, हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरपूड, मीठ आणि तांदळाचे पीठ घालून चांगले सारण बनवा.
आता पाण्याच्या मदतीने तयार पिठाचे वडे थापून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मेदू वडे गोल्डन फ्राय करून घ्या.
खोबऱ्याची चटणीसोबत किंवा आणि सांबार सोबत मेदू वड्यांचा आस्वाद घ्या.
रव्यामुळे वडे चांगले कुरकुरीत होतील.