Shreya Maskar
आपल्याकडे अनेक वेळा रात्रीच्या चपात्या उरतात. या चपातीपासून झटपट लाडू बनवा.
उरलेल्या चपातीचे लाडू बनवण्यासाठी उरलेल्या चपात्या, वेलची पावडर, खसखस, बेदाणे, साखर आणि तूप इत्यादी साहित्य लागते.
उरलेल्या चपातीपासून लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम उरलेल्या चपात्या मिक्सरला वाटून घ्या.
आता पॅनमध्ये तूप आणि साखर टाकून फेटून घ्या.
या मिश्रणात भाजलेली खसखस आणि उरलेल्या चपातीचे मिश्रण मिक्स करा.
या मिश्रणात बेदाणे घालून छाम एकजीव करा.
आता या मिश्रणाचे छान लाडू वळून घ्या.
लाडूची चव आणि पोषण वाढवण्यासाठी तुम्ही यात बारीक ड्रायफ्रूट्स कापून टाकू शकता.