ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा आपल्याकडून मोबाईचे चार्जर किंवा लॅपटॉपच्या चार्जरचे बटण चालू राहते.
परंतु,चार्जरचे बटण चालू राहिल्याने विजेचे बिल वाढते का,जाणून घ्या.
जर तुमचा चार्जर दिवसभर सॉकेटमध्येच असतो, तर यामुळे १ ते २ मीटरचे रिडिंग वाढू शकते.
तसेच तुमच्या लॅपटॉपचे चार्जरचे बटण देखील चालू राहिल्यास १ ते २ रिडिंग वाढते.
जर तुमच्या घरात एकपेक्षा जास्त चार्जर दिवसभर चालू राहत असतील तर यामुळे विजेचे बिल वाढू शकते.
मोबाईल किंवा लॅपटॉपची चार्जिंग पूर्ण झाल्यास चार्जर सॉकटेमधून काढून ठेवा.
चार्जरचा वापर पूर्ण झाल्यावर काढून ठेवा यामुळे विजेची बचत होते, यासह विजेचा धक्का लागण्याची धोकाही कमी होतो.