Tanvi Pol
पहिल्यांदा एक कप बासमती तांदूळ अर्धा तास भिजवून ठेवा.
कुकरमध्ये तेल गरम करून त्यात शहाजिरं आणि लवंग, दालचिनी, तमालपत्र, बडीशेप टाका.
त्याच मसाल्यांमध्ये चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतवा.
आलं-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या, टोमॅटो टाकून थोडं परतवा.
पुन्हा एकदा गाजर, बीन्स, मटार, बटाटा यांसारख्या भाज्या घालून परतवा.
चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि थोडं मिंट-कोथिंबीर घालून मिसळा
भिजवलेला तांदूळ आणि दीड पट पाणी घालून एक शिटी करुन घ्या.
कुकर थंड झाल्यावर पुलाव फोर्कने हलवून गरमागरम सर्व्ह करा.