ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आळस हा मानवाचा शरीरात राहणारा सर्वात मोठा शत्रू आहे.
जीवनातील प्रत्येक व्यक्ती आपल्या वैयक्तिक कामात ,ऑफिसच्या कामात, आणि नात्यात आळशी असतो.
आळस म्हणजे कोणतेही काम पुढे ढकलणे किंवा काम करण्याची इच्छा नसणे आहे.
शरीरातील आळस दूर करण्यासाठी सर्वात आधी आपल्या जीवनशैलीत बदल करा.
दिलेले काम वेळेच्या आधी पूर्ण करा.त्यामुळे तुम्हाला काम उद्यावर लोटण्याची सवय लागणार नाही.
आळस दूर करण्यासाठी आणि निरोगी शरीरासाठी रोज हेल्दी आहार आणि पुरेशी झोप घ्या.
दररोज आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, आणि छोट्या मोठ्या यशासाठी स्वत:चे कौतुक करा.